Category Archives: Uncategorized

साथ

साथ म्हणजे नक्की काय असते? एकमेकांबरोबर असणं म्हणजे साथ ,की एकमेकांबरोबर नसताना सुद्धा जी सोबत राहते ती साथ? जे बोलूनही समजत नाही आणि न बोलताही पोहोचतं.. उघड्या डोळ्यांना दिसत नाही आणि पापण्या मिटल्या की संपूर्ण चित्र उभं राहतं..कानांना ऐकू येत … Continue reading

Posted in Random Thoughts, Uncategorized | Tagged , , , , | Leave a comment

पसारा

‘पसारा’ आवरताना नेहेमी वाटतं केवढा हा डोंगर!! किती वेळ वाया चालला आहे आवरताना. सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवताना जीव नकोसा होतो. वाटतं गोष्ट हातात घेतली आणि वापरून झाली की लगेच का नाही जागच्या जागी ठेवत आपण? किती नि काय काय … Continue reading

Posted in Random Thoughts, Uncategorized | Tagged , | Leave a comment

‘नयनतारा सहगल’ यांचं मराठी साहित्य संमेलनातील आमंत्रण रद्द करणं लज्जास्पद.. या कृत्याचा निषेध!

‘नयनतारा सहगल’ या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून येणार ही मला फार आशादायक बाब वाटली होती. ‘रिच लाईक अस’ या पुस्तकासाठी त्यांना १९८६ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला होता. देशातल्या वाढत चाललेल्या असहिष्णू वातावरणाच्या निषेधात आवाज … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , | Leave a comment

“Do you think you are beautiful?

गंमत म्हणून,बदल म्हणून,आवड म्हणून एखादी गोष्ट करणं वेगळं आणि माझ्यामध्ये अमुक एक चांगलं नाहीये ते लपण्यासाठी किंवा टेम्पररी त्याला दूर करण्यासाठी एखादी गोष्ट करणं ह्यामध्ये फरक आहे आणि तो कित्येक बायकांना दिसत नाही . काय आहे ना.. आश्चर्य वाटेल पण सुदंर काय आहे ह्याबत आपण अतिप्रचंड कंडिशन होत असतो. अगदी लहान मुलींच्या बाहुल्यांपासून ते टीव्ही मध्ये दिसणाऱ्या कार्टून कॅरेक्टर पर्यंत. अमुक एक ब्युटीफुल असा मारा आपल्या मनावर होत राहतो. प्रत्येक स्त्रीने आरशात पाहून मी सुंदर आहे का? अगदी जशी आहे तशी ..असा प्रश्न स्वतःला विचारून पहाच . पहिली रिऍक्शन जर ओठ अलगदपणे बाजूला सारून ओबडधोबड दात बाहेर येणारी असेल तर तुम्ही अजूनही एक माणूस म्हणून जिवंत आहात असं समजा.
Continue reading

Posted in Uncategorized | 1 Comment

‘अंग्रेजी मै कहते है’

फाईव्ह काँटिनेंट्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०१७ मध्ये बेस्ट फिचर फिल्म आणि बेस्ट डायरेक्टर हे दोन अवॉर्ड्स मिळवणारा हरीश व्यास दिग्दर्शित ‘अंग्रेजी मै कहते है’ हा चित्रपट नक्कीच वेगळा आहे. संजय मिश्रा आणि पंकज त्रिपाठी ( रोल छोटा आहे तरीही) हि … Continue reading

Posted in Not A movie Review!!, Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , | Leave a comment

सफल प्रेमाच्या असफल गोष्टी – ५

तिने उगाचच पुन्हा स्वतःला आरशात पाहिलं. आज जरा जास्तच मोठं कुंकू लावलं आहे का आपण ती स्वतःशीच पुटपुटली. राहू दे तेच बरं असं म्हणून ती खोलीबाहेर पडली. अमर तिची वाट पाहतच होता. त्याचा हात हातात पकडून जोडीने दोघे बाहेर आले. … Continue reading

Posted in सफल प्रेमाच्या असफल गोष्टी, Uncategorized | Tagged , , , , , , , , | 1 Comment

मला (बि)घडवणारे लेखक ८ – ओरहान पामुक

काही लेखक एखाद्या पुस्तकाने इतके प्रकाश झोतात येतात कि संपूर्ण जग त्या पुस्तकावरनं त्यांना जोखू पाहतं. पण खरं पाहायला गेलं तर त्या लेखकाची प्रतिभा ह्या सगळ्याच्या पलीकडची असते. असंच काहीसं ह्या लेखकाबाबत होतं. ‘ओरहान पामुक’. मला वाटतं मी आजवर वाचलेल्या … Continue reading

Posted in मला (बि)घडवणारे लेखक, Uncategorized | Tagged , , , , , , , , , | 2 Comments

एकटेपणा!

माणूस सर्वात जास्त जर कुठल्या गोष्टीला घाबरत असेल तर तो म्हणजे एकटेपणा. अगदी मानवी उत्क्रांतीचा इतिहास बघायचा झाला तर घोळक्याने शिकार करणे, एकत्र राहणे ह्या सर्व गोष्टी एकटेपणाच्या भीतीतूनच निर्माण झाल्या आहेत. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे असं लहान पाणी … Continue reading

Posted in एकटेपणा!, Uncategorized | Tagged | 2 Comments

Be strong!

आयुष्यात असे अनेक प्रसंग घडतात जेंव्हा स्वतःचा स्वतःवरंच विश्वास उरत नाही. आपण अंधाराच्या खोल गर्ततेत जात आहोत असं वाटतं. कितीही ठरवलं तरी त्यातून बाहेर पडणं शक्य होत नाही. आपल्याला नक्की काय हवंय हे कळत नाही. कोणता रस्ता घ्यावा हे उमजत … Continue reading

Posted in Be strong!, Uncategorized | Tagged | Leave a comment

अमर फोटो स्टुडीओ

नाटक म्हणजे माझा जीव की प्राण. माझं पिल्लू लहान असल्यामुळे फार नाटकांना जाता येत नाही. पण ह्यावेळेस योग जुळून आला. नाटक होतं “अमर फोटो स्टुडीओ”. मनस्विनी लता रविंद्र यांनी लिहिलेलं आणि निपुण धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेलं हे नाटक खूप काही … Continue reading

Posted in अमर फोटो स्टुडीओ, Uncategorized | Leave a comment