Author Archives: Saniya Bhalerao

About Saniya Bhalerao

I am M.Tech in Biotechnology. Academics and research in life sciences is what i do! But my passions are movies, Music and books! I write to express my feelings about everything that makes me feel alive.. मी सानिया! जगण्यासाठी आवश्यक अश्या चार गोष्टी आहेत माझ्यासाठी पुस्तकं, नाटक - सिनेमे , संगीत आणि सायन्स! ज्या ज्या गोष्टी मला जिवंत ठेवतात त्या सगळ्यांवर मला लिहायला आवडतं. माझं भाषांवर खूप प्रेम आहे. बंगाली, जर्मन, रशियन, फ्रेंच, तुर्किश अश्या कित्येक भाषांमधलं साहित्य जे इंग्रजी मध्ये अनुवादित केलं आहे ते मला वाचायला आवडतं. बुकर, पुलित्झर, नोबेल पारितोषिकं मिळालेले लेखक मी वाचते आणि त्यांचा तगडा प्रभाव माझ्यावर आहे. मराठी मला जवळची वाटते आणि म्हणून मी मराठीत लिखाण करते. माझ्या विश्वात तुमचं स्वागत आहे!

La felicidad- Steve Cutts

सध्या स्टीव्ह कट्स ( Steve Cutts ) ह्याची एक शॉर्ट फिल्म सध्या खूप गाजते आहे. ” La felicidad” म्हणजेच हॅपीनेस ह्या नावाची. अवघ्या चार मिनिटांची हि ऍनिमेशन फिल्म. स्टीव्ह कट्स चं वैशिष्ट्य हे कि तो साधारण १९४० ते ५० च्या … Continue reading

Posted in La felicidad- happiness! | Tagged , , , | Leave a comment

मला (बि)घडवणारे लेखक ७ – सानिया

मला माझं नाव लहानपणापासूनच फार आवडायचं. तसं सगळ्यांनाच आवडतं पण साधारण ८० च्या दशकात सानिया हे नाव फार प्रचलित नव्हतं. माझं नाव सानिया नावाच्या लेखिकेवरून ठेवलं आहे हे बाबांनी लहान असताना सांगितलं होतं आणि त्याच क्षणी हि सानिया खूप कोणीतरी … Continue reading

Posted in मला (बि)घडवणारे लेखक | Leave a comment

मला (बि)घडवणारे लेखक ६ – जॉर्ज आर आर मार्टिन

एक लेखक एपिक फँटसी लिहायला घेतो काय, सुरवातीला तीन खंडात पूर्ण होणाऱ्या पुस्तकाचे पाच खंड होतात काय, २० ते २२ वर्ष तो लेखक त्याच कथानकात नवीन नवीन पात्र आणतो काय , कथा गुंफत जातो काय आणि सुरवातीला लिहिलेले तीन खंड … Continue reading

Posted in मला (बि)घडवणारे लेखक | Leave a comment

मला (बि) घडवणारे लेखक -५ फ्रान्झ काफ्का

एखाद्या लेखकाच्या अवघ्या चाळीस वर्षांच्या जीवन कालखंडात जेमतेम दोन ते तीन पुस्तकं प्रकाशित होतात आणि त्याचं बाकीचं काम त्याच्या मृत्यपश्चात त्याचा मित्र प्रकाशित करतो आणि त्याची पुस्तकं जगभर लोकप्रिय होतात . इतकेच नाही तर त्याच्या नावाने साहित्य वर्तुळात पुरस्कार दिला … Continue reading

Posted in मला (बि)घडवणारे लेखक | Leave a comment

मला (बि)घडवणारे लेखक – ४ गाब्रिएल गार्सिया मार्केझ

पहिल्यांदा जेंव्हा मी हे नांव वाचलं तेंव्हा आपल्याला ह्या लेखकाचं साधं नाव उच्चारता येत नाहीये त्याने लिहिलेलं काय कप्पाळ कळणार आहे हा विचार मनात डोकावून गेला. पण साहित्यातलं नोबेल मिळालेल्या लेखकांची पुस्तकं वाचायचीच हे ठरवल्यामुळे सुरवात ह्याच लेखकाने करायची हे … Continue reading

Posted in मला (बि)घडवणारे लेखक | Leave a comment

मला (बि)घडवणारे लेखक ३ – पाउलो कोएलो

मला आठवतंय तेंव्हा पासून पुस्तकं मला प्रियं. माझ्या आई बाबांमुळे लहानपणीच पुस्तकांबद्दल अपरंपार प्रेम आणि जिव्हाळा होता मला. आत्तापर्यंच्या वाचन प्रवासात वाचलेल्या लेखकांमधून असं निवडून लिहणं फार कठीण काम वाटतं मला. माझ्या वाचनाची सुरवात मराठीने झाली. पुलं , अत्रे यांच्यापासून … Continue reading

Posted in मला (बि)घडवणारे लेखक | Leave a comment

मला (बि)घडवणारे लेखक २- रबिन्द्रनाथ टागोर

खरंतर आज ज्यांच्याबद्दल मी लिहिणार आहे त्यांना आपण एक कवी म्हणून जास्त ओळखतो. त्यांच्या कविता असामान्य आहेतच पण त्याच बरोबरीने त्यांनी लिहिलेल्या कथा देखील तितक्याच संवेदनशील आणि प्रभावी आहेत. भारताला लाभलेले एक रत्न ज्यांनी आपल्या देशाला राष्ट्रगीत दिलं असे पहिले … Continue reading

Posted in मला (बि)घडवणारे लेखक | Leave a comment

मला (बि)घडवणारे लेखक १- हारुकी मुराकामी

पुस्तकं म्हणजे माझा जीव कि प्राण. मी पुस्तकांशिवाय जगूच शकत नाही. माझ्या उशाशी नेहेमी एक पुस्तक तुम्हाला सापडेलच. एवढंच काय बुकशेल्फ आणि बैठकीतल्या कपाटांमध्ये पुस्तकं मावेनाशी झालीत कि माझ्या कपडयांच्या कपाटात देखील पुस्तकं ठेवते मी. इतकं प्रचंड वेड आहे मला … Continue reading

Posted in मला (बि)घडवणारे लेखक | Leave a comment

मला (बि)घडवणारे चित्रपट ६ – “सिड्युसिंग मिस्टर परफेक्ट “

ह्या सिरीजचा शेवट कोरियन चित्रपटाने करावा असं मनात होतं. बरेचसे कोरियन चित्रपट अतिशय संवेदनशील आणि वूमन सेंट्रिक आहेत. प्रेम कसं दाखवायचं हे त्यांना पक्कं कळलेलं आहे. रोमँटिक जॉनर मध्ये मोडणारे विंडस्ट्रक, लव्ह फोबिया ,मोर दॅन ब्लू,माय सॅसी गर्ल, माय लिटिल … Continue reading

Posted in मला (बि)घडवणारे चित्रपट | Leave a comment

मला (बि)घडवणारे चित्रपट ५ – अस्तु- So be it!

मराठी भाषेतला कुठला चित्रपट निवडावा यावर खूप विचार केला. पण एक चित्रपट काही केल्या डोक्यातून जाईचना! काही चित्रपट आपल्याला एवढे भारावून टाकतात कि त्या अनुभवाबद्दल लिहिताना खूप गलबलून व्हायला होतं. लिहायला बसलं कि नुसतं मन सैरभैर होऊन जातं . जे … Continue reading

Posted in मला (बि)घडवणारे चित्रपट | Leave a comment