Feminazi!

खरतरं ह्याविषयावर लिहायचं नाही हे पक्कं ठरवलं होतं. पण काय आहे ना की आंतरराष्ट्रीय महिला दिन वगैरे सारखे सोहळे आले की पेपरवाल्यांपासून ते फेबु पर्यंत सगळीकडेच महिला सशक्तीकरण, feminism चे वारे वहायला सुरु होतात. काही वृत्तपत्रांनीतर मागच्या आठवड्यातच शतकातल्या ग्रेट महिलांना गौरवण्यासाठी त्यांच्यावर लेख बिख लिहून पान भरली. हे कमी होतं म्हणून की काय त्यात फेबु वरच्या अतिउत्साही बापड्यांनी आज सकाळ पासूनच महिला दिनाच्या शुभेच्छा असले फालतू मेसेजेस इनबॉक्सायला सुरवात केली . मग अनावर झालं आणि म्हणून उद्याच्या महिला दिनाच्या गराड्यात हो पोस्ट अडकण्याआधीच आज पोस्टुन टाकते आहे . २०१७ सुरु असूनही अजून किती वर्ष महिला दिन वगैरे सारख्या मूल्यहीन आणि अर्थहीन दिवस साजरे करणार आहोत आपण? कधी आणि केंव्हा थांबणार आहे हे? मुळात महिलांच्या अमूल्य योगदानाचे हिशोब करण्याची गरजच का पडावी?
खरं पाहायला गेलं तर गेली कित्येक वर्ष मी का कोणास ठाऊक हि परिस्थिती बदलेल आणि चित्र पालटेल असा येडछाप आशावाद उराशी बाळगून होते. आज मला विचाराल तर मला अतोनात दुख आणि शरम वाटते की मी या विश्वात बाईचा जन्म घेऊन अवतरले. मला जर निवड करता आली असती तर केवळ ह्याच नाही तर प्रत्येक जन्मात मी पुरुष म्हणूनच जन्माला येऊ इच्छिते. हे इथवर थांबत नाही. मला मुलगी झाली हि त्याहून वाईट गोष्ट. माझं काय झालं ते झालं तिच्या बिचारीच नशीब इतकं करंट असावं ? दोन x च्या जागी एक जागा y क्रोमोसोम ने घेतली असती तर हा अनर्थ टळला असता ना ! किमान आमच्या दोघींपैकी एका तरी जीवाला निडर, मनासारखं जगता आला असतं. अस्वस्थ झालं ना मन हे वाचून? काहींना वाटेल की हे अतिरंजित करते आहे मी पण नाही. अगदी हेच आणि ह्याहून कित्येक पटींनी जहाल मत आहे माझं.

उदाहरणासहीत बोलायचं झाल्यास आमच्या सोसायटीचा आयांचा कट्टा आहे. तिथले एक संभाषण.

आई न. १: आग , परवा सोहमचा फेबु वरचा फोटो पहिला. किती हंड्सम दिसत होता तो.
सोहमची मम्मी: हो गं. तूला माहितीये त्या पार्टीमध्ये पठ्ठ्या फक्त मुलीनाचा फ्लाइंग कीस आणि हाय करत होता….
आई न १: (खिदाळून)…. अरे वा….आतापासूनच…फेमस होणार पोरगा तुझा..
मी: (मुद्दामच ठरवून)…. माझी मुलगी पण असंच करते…फक्त मुलांनाच हाय करते…स्माईल देते…
उरलेल्या आया: माझ्या कडे काय हि बाई अश्या अविर्भावात बघतात.
मी मात्र खूप हसते ह्यावर…सगळ्या मम्म्या आता मला टाळतात.
तात्पर्य: वय वर्ष चार असलेला मुलगा पोरींना हाय केला की क्युट आणि तेच एका मुलीने केलं की? अगदी लहानपणापासूनच कॅरेक्टर वगैरे सारख्या खुळचट शब्दांची बीजं आपणच नकळतपणे रोवत असतो.

उदाहरण २: शाळेतल्या मैत्रिणींचं गेटटुगेदर
मैत्रीण १: अग माहितीये का, अमुक तमुक दुसर लग्न करतीये.
मैत्रीण २: होका? अग पण तिला दोन मुली आहेत ना?
मी: ( अस्वस्थ होऊन फक्त ऐकते आहे)
मैत्रीण ३: तिचा डिवोर्स झाला का?
मैत्रीण चार: हो…काही महिन्यांपूर्वी.
मैत्रीण १: बघ ना… कशी लगेच तैय्यार झाली हि बया? काहीच वाटत नसेल का ग तिला?
मैत्रीण २: खरंच.. काही बायका किती इनसेन्सिटीव अस्तात नै?
मी: रागावर नियंत्रण न ठेवता…. तुमच्या सारख्या बायका आहते ना सगळी सेन्सिटीविटी जपायला… नॉन्सेन्स .. तिचं आयुष्य..तिचा त्रास…तो आपल्याला काय समजणार आहे. मला तर कौतुक वाटतं तिचं..
माझा पत्ता कट….
तात्पर्य: डिवोर्स होवो किंवा नवरा एक्स्पायर होवो… दुसरं लग्न करणारी स्त्री निर्लज्ज असते. त्यात तिला मुलं वगैरे असतील तर मग जास्तच. समाजाला त्यामागची कणखर पणे उभी राहिलेली स्त्री दिसत नाही.

कोण कोणाबरोबर झोपलं ह्यावरून चारित्र्य जोखणारा हा समाज केवळ बाईलाच दोषी समजतो. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हि साधी गोष्ट कोणाच्याच लक्षात येत नाही. तर अश्या समाजामध्ये बाई म्हणून जन्माला येण्याची आणि एका मुलीला जन्माला घालण्याची घोडचूक करून बसले आहे. जिथे बाईला तिच्या कपड्यांच्या लांबीवरून, पुरुषांबरोबर ती किती सहज फिरते, रात्री किती वाजता परत येते, तिचे मित्र आणि यार किती आहेत, ती किती आणि कोणाबरोबर ड्रिंक करते, तिचं लग्न करण किंवा न करण तिच्या availability शी जोडल्या जातं, तीचं एका पेक्षा जास्त पुरुषांबरोबर संबंध ठेवणं, सेक्स बद्दल ती किती मोकळं आणि स्पष्ट बोलते हे सगळं सगळं थेट तिच्या चारित्र्याशी जोडल्या जातं आणि ह्या वरून तिचं शरीर उपभोगणं सोपं जाणार आहे की कठीण हे जोखू पाहणाऱ्या समस्त समाजाला काय म्हणावं?

उजळ रंग, स्तनांचा उभार, सपाट, रेखीव पोट, निमुळत्या मांड्या, घनदाट केस, टोंन्ड बटक्स ,लालचुटुक ओठ, काळेभोर डोळे आणि अश्या अगणित शारीरिक मापदंदानी माझं सौंदर्य तोलू पाहणाऱ्या या समस्त समाजाची मी आज एक स्वतंत्र विचारांची, निर्भीड मनाची, मोकळ्या जागेत मनसोक्त हुंदडू वाटणारी, सेक्क चा बाऊ न करणारी, दिसण्यापेक्षा असण्याला महत्त्व देऊ बघणारी, हृद्य आणि मेंदू केवळ ह्या दोनच अवयवांना सौंदर्याचं प्रतीक मानणारी आणि मला बंधनात अडकवू बघणाऱ्या सगळ्यानाच झुगारून लावण्याची हिंमत ठेवणारी अशी जिला संपूर्ण असण्यासाठी कोणाचीही गरज भासत नाही अशी एक स्त्री म्हणून माफी मागते कारण जी तुम्हाला अपेक्षित आहे ती बाई मी कधीच होऊ शकत नाही आणि होणारही नाही. माफच करा मला. मला हवं तसं आणि तसच जगणार मी. येवढ बोलून मी माझे चार शब्द संपवते. समस्त महिला वर्गाचा (परा)जय असो!

महत्वाची टीप : हि पोस्ट उपहासात्मक आहे . मी स्वतःला अजिबात गरीब बिचारी समजत नाही आणि पुरुषांना अत्याचारी वगैरे तर नाहीच नाही . हि पोस्ट समाजाच्या मानसिकतेविषयी आहे याची कृपया नोंद घ्यावी .

Advertisements

About Saniya Bhalerao

I am M.Tech in Biotechnology. Academics and research in life sciences is what i do! But my passions are movies, Music and books! I write to express my feelings about everything that makes me feel alive.. मी सानिया! जगण्यासाठी आवश्यक अश्या चार गोष्टी आहेत माझ्यासाठी पुस्तकं, नाटक - सिनेमे , संगीत आणि सायन्स! ज्या ज्या गोष्टी मला जिवंत ठेवतात त्या सगळ्यांवर मला लिहायला आवडतं. माझं भाषांवर खूप प्रेम आहे. बंगाली, जर्मन, रशियन, फ्रेंच, तुर्किश अश्या कित्येक भाषांमधलं साहित्य जे इंग्रजी मध्ये अनुवादित केलं आहे ते मला वाचायला आवडतं. बुकर, पुलित्झर, नोबेल पारितोषिकं मिळालेले लेखक मी वाचते आणि त्यांचा तगडा प्रभाव माझ्यावर आहे. मराठी मला जवळची वाटते आणि म्हणून मी मराठीत लिखाण करते. माझ्या विश्वात तुमचं स्वागत आहे!
This entry was posted in Feminazi. Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s