Be strong!

आयुष्यात असे अनेक प्रसंग घडतात जेंव्हा स्वतःचा स्वतःवरंच विश्वास उरत नाही. आपण अंधाराच्या खोल गर्ततेत जात आहोत असं वाटतं. कितीही ठरवलं तरी त्यातून बाहेर पडणं शक्य होत नाही. आपल्याला नक्की काय हवंय हे कळत नाही. कोणता रस्ता घ्यावा हे उमजत नाही. कोणावर विश्वास ठेवावा हे समजत नाही. आशा, श्रद्धा हे शब्दच पोकळ वाटू लागतात. अश्या वेळेस कोणीतरी मसीहा यावा आणि त्याने आपल्याला ह्यातून बाहेर काढावं असं वाटू लागतं. पण असं होत नाही. rather मला वाटतं असं होऊच नये. कारण मसीहा, फरिश्ता, देवदूत हे अतिशय तकलादू शब्द आहेत. मुळात आपलं आयुष्य कोण्या दुसऱ्याने ठीक करावं हि अपेक्षाच अवास्तव आणि चुकीची आहे. एखाद्या प्रसंगातून क्वचितप्रसंगी आपली अशी मदत कदाचित कोणी करेलही पण अश्याने आपल्याला कठीण प्रसंगांमधून बाहेर पाडण्यासाठी सतत कोणानकोणाच्या मदतीची गरज पडू लागते आणि मग अडचणींना खंबीरपणे तोंड देण्याची हिंमत आपण एकटवू शकत नाही. याउलट जर आपण त्या अडचणीला स्वतःहून सामोरे गेलो तर पुढच्यावेळेस आलेल्या अडचणीला आपण हिमतीने सामोरे जाऊ शकू.

अडचणींवर स्वतःहून मात केल्यामुळे आत्मविश्वासही वाढतो. मग कोण काय म्हणत ह्याने आपल्याला फार फरक पडत नाही. कित्येकदा बऱ्याच लोकांना बाकीचे त्यांच्याबद्दल काय बोलतात, त्यांना चांगली, प्रेमळ व्यक्ति समजतात कि नाही ह्याने बराच फरक पडतो. आपली छबी चांगली दिसावी ह्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. कोणी काही बोललं, मग ते चांगलं आणि वाईट दोन्हीही असो तरीही ह्यांना त्याने प्रचंड फरक पडतो. म्हणजे त्यांच्यात आत्मविश्वास कमी असतो असं नाही पण आपण कसे आहोत हे जर आपल्याला पक्क ठाऊक असेल तर कोणाच्याही स्तुतीने किंवा निंदेने फरक पडायला नको. आपली स्वतःबद्दलची प्रतिमा ( self image) हि अतिशय strong आणि वेल डीफाइंड असणं आवश्यक आहे. म्हणजे मग अगदी कोणीही आपल्याला काहीही म्हटलं तरी स्वतःच्या गुणांवर शंका घ्यावी लागत नाही. आपलं स्वतःवर प्रेम, स्वतःच्या चांगुलपणावर विश्वास असणं निकडीचं आहे. म्हणजे मग अगदी जवळच्या व्यक्तीनेही आपल्याला अंतर दिलं किंवा बरं- वाईट म्हटलं तरी फार काळ मनस्ताप होत नाही. लिहायला सोपी आणि वर्तनात आणण्यास अत्यंत कठीण अशी हि बाब असली तरी आंतरिक समाधान मिळवून देणारी हि गोष्ट. कधी कधी नाही जमत. कळतं पण वळत नाही. आत्मविश्वासाला तडे जातात. अगदी स्वतःच्या दिसण्यापासून ते असण्यापर्यंत शंका यावी असे क्षणही येतात. पण हीच कसोटी समजायची. कोणाच्याही आधाराची अपेक्षा न करता घट्ट पाय रोवत उभं राहायचं, नव्याने स्वतःला शोधायला, जशी परिस्थिती आहे तशी स्वीकारायला, स्वतःला माफ करायला, स्वतःवर प्रेम करायला आणि स्वतःच्या निकषांवर आयुष्य जगायला. Lets forgive ourselves for mistakes we have made. cheers to inner peace …. cheers to life…

Advertisements

About Saniya Bhalerao

I am M.Tech in Biotechnology. Academics and research in life sciences is what i do! But my passions are movies, Music and books! I write to express my feelings about everything that makes me feel alive.. मी सानिया! जगण्यासाठी आवश्यक अश्या चार गोष्टी आहेत माझ्यासाठी पुस्तकं, नाटक - सिनेमे , संगीत आणि सायन्स! ज्या ज्या गोष्टी मला जिवंत ठेवतात त्या सगळ्यांवर मला लिहायला आवडतं. माझं भाषांवर खूप प्रेम आहे. बंगाली, जर्मन, रशियन, फ्रेंच, तुर्किश अश्या कित्येक भाषांमधलं साहित्य जे इंग्रजी मध्ये अनुवादित केलं आहे ते मला वाचायला आवडतं. बुकर, पुलित्झर, नोबेल पारितोषिकं मिळालेले लेखक मी वाचते आणि त्यांचा तगडा प्रभाव माझ्यावर आहे. मराठी मला जवळची वाटते आणि म्हणून मी मराठीत लिखाण करते. माझ्या विश्वात तुमचं स्वागत आहे!
This entry was posted in Be strong!, Uncategorized and tagged . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s