गुलजार है जिंदगी!

काही लोकं आणि त्यांचं लिखाण अगदी वेडं करून सोडतं . जसकी गुलजार साहेब… त्यांचं बोलणं , लिखाण सगळंच एकदम कातिल . जश्न ए रेख्ता मध्ये त्यांना ऐकलं , यांच्याशी थोडं बोलता आलं …. सारा अनुभव विलक्षण . गुलजार म्हणतात “सगळ्यात अवघड जर काही असेल तरसाध्या आणि सोप्या शब्दात व्यक्त होणं “. त्यांच्या कविता , लिखाण हे अगदी साधं – सोपं पण खूप गहिरं असतं . विशेषतः ते प्रेमावर, नात्यांवर जे लिहितात ते तर मला जाम आवडतं . त्यांची ८ ते ९ पुस्तकं जी फारशी उपलब्ध नाहीत ती देखील तिथे मिळाली , वाचली आणि परत परत त्यांच्या लेखणीच्या , सादगीच्या प्रेमात पडले .

“यादों की अलमारी में देखा, वहां मुहब्बत फटेहाल लटक रही है”

गुलजार साहेबांच्या ह्या एका साध्या वाक्यात किती खोल अर्थ दडला आहे .म्हणजे बघाना आपण दैनंदिन आयुष्य जगतो . संसार , काम , मुलं ह्यासगळ्यात आपलं प्रेम कुठेतरी कोपऱ्यात पडलेलं असतं .आपण कित्येकदा प्रेमापासून स्वतःला वंचित ठेवतो . कित्येकांना आपलं प्रेम व्यक्त करण्याची संधी देखील मिळत नाही आणि मग आपण कित्येक न मिळालेल्या गोष्टींप्रमाणे प्रेमाला मनाच्या कोपऱ्यात घट्ट बांधून टाकतो मनाला समजावून आयुष्याशी समझोता करून टाकतो . प्रेमाची लक्तरं पाठीशी घेऊन तसंच जगतो. निरर्थक….

बहुत मुश्किल से करता हूँ,
तेरी यादों का कारोबार,
मुनाफा कम है,
पर गुज़ारा हो ही जाता है…

ह्या गुलजारांच्या ओळी माझ्या खूप आवडत्या आहेत . सध्या , सोप्या पण काळजात घुसणाऱ्या . काही लोकं आपल्या आयुष्यात काही काळासाठीच येतात . आपल्याला लाख वाटलं कि त्यांनी आयुष्यभर असावं पण तसं होत नाही , मग मागे राहतात त्या केवळ आठवणी . त्यांच्या सोबत घालवलेला काळ इतका मोहक आणि प्रसन्न असतो कि ती व्यक्ती बरोबर नसली तरीही तिच्या आठवणी , अस्तित्व आपल्या बरोबर कायम रहातं . मग ह्याच आठवणी आपली सोबत बनतात आणि मग आपला प्रवास सुरु होतो … खऱ्या प्रेमाचा … असं प्रेम ज्याला पोहोचण्याचं ठिकाण नसतं.. म्हणतात ना सफर खूबसूरत है मंजिल से भी … तसंच काहीसं… प्रेमात विरह असला तरी ह्या चार ओळी त्यात रडत बसणाऱ्या नाहीत याउलट ती व्यक्ती बरोबर नसली तरी तिच्या आठवणीही आयुष्य जगायला पुरेश्या आहेत असं सांगतात . प्रेम असावं तर असं !

अशीच एक ओळ अजून आहे ” ऐ इश्क़.. दिल की बात कहूँ तो बुरा तो नहीं मानोगे, बड़ी रहत के दिन थे तेरी पहचान से पहले.”
प्रेमात आकंठ बुडालेल्या आणि प्रेमातल्या दर्द चा एहसास झालेल्या तनहां हृदयाची हि साद आहे . प्रेम कितीही सुखद भावना असली तरीही इश्क़ आदमी को निकम्मा कर देता है असं म्हणतात ते उगाच नाही . प्यार मैं चैन नहीं मिलता … खरंच आहे ते . प्रेम उनाड असतं . ते माणसाला वेडं करतं , बेभान करतं आणि आंधळं , बहिरं आणि अजून काय काय करतं . पण असं असलं तरी जो नशा इश्क़ मै है वो और कहाँ ?

आता थोड सिरिअस नोट वर गुलजार म्हणतात , “बहोत अंदर तक जला देती है, वो शिकायतें जो बयाँ नही होती”
कित्येकदा आपण नाराज असतो अश्या माणसांवर ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो . ऐसा प्यार जिसके लिये जान दि जाये … पण ते अव्यक्त राहतं. असं प्रेम जे जर बोलून दाखवलं तर त्याची गेहेराई समजू शकणार नाही … अगदी त्या व्यक्तीलाही .. असं दुर्दैवी प्रेम जेंव्हा आपण कोणावर करतो तेंव्हा त्या व्यक्तीपासून दूर राहावं लागण्याची नाराजी , कधी काही बिनसलं त्या बद्दलची नाराजी त्याला किंवा तिला व्यक्त देखील करता येत नाही . कित्येक अश्रू जे डोळ्यातून ओघळले पण चेहेऱ्यावर सुकून गेले ह्या आशेने कि कोणी येऊन ते हलकेच पुसतील… अश्या कित्येक अव्यक्त भावना ज्या त्या व्यक्ती पर्यंत पोहोचल्याच नाही… त्या मन जाळत राहतात .. सतत !

इतक्या सध्या शब्दात आत्म्याच्या अंतरंगात रुंजी घालू शकणाऱ्या ओळी लिहिण्याची गुलजार साहेबांची हातोटी केवळ जबराट . त्यांच्या लेखणीला सलाम. आज का दिन प्यार के नाम ! Cheers to those who are in love with Love !

Advertisements

About Saniya Bhalerao

I am M.Tech in Biotechnology. Academics and research in life sciences is what i do! But my passions are movies, Music and books! I write to express my feelings about everything that makes me feel alive.. मी सानिया! जगण्यासाठी आवश्यक अश्या चार गोष्टी आहेत माझ्यासाठी पुस्तकं, नाटक - सिनेमे , संगीत आणि सायन्स! ज्या ज्या गोष्टी मला जिवंत ठेवतात त्या सगळ्यांवर मला लिहायला आवडतं. माझं भाषांवर खूप प्रेम आहे. बंगाली, जर्मन, रशियन, फ्रेंच, तुर्किश अश्या कित्येक भाषांमधलं साहित्य जे इंग्रजी मध्ये अनुवादित केलं आहे ते मला वाचायला आवडतं. बुकर, पुलित्झर, नोबेल पारितोषिकं मिळालेले लेखक मी वाचते आणि त्यांचा तगडा प्रभाव माझ्यावर आहे. मराठी मला जवळची वाटते आणि म्हणून मी मराठीत लिखाण करते. माझ्या विश्वात तुमचं स्वागत आहे!
This entry was posted in गुलजार है जिंदगी!. Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s