एकटेपणा!

माणूस सर्वात जास्त जर कुठल्या गोष्टीला घाबरत असेल तर तो म्हणजे एकटेपणा. अगदी मानवी उत्क्रांतीचा इतिहास बघायचा झाला तर घोळक्याने शिकार करणे, एकत्र राहणे ह्या सर्व गोष्टी एकटेपणाच्या भीतीतूनच निर्माण झाल्या आहेत. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे असं लहान पाणी समाजशास्त्राच्या पुस्तकात वाचले होते. आजूबाजूला पाहिलं तर कित्येक माणसं गर्दीमध्ये, घोळक्यामध्ये राहणं पसंत करतात. लहानपणी नातेवाईकांचा घोळका, मग कोलेजात मित्र-मैत्रिणीचा घोळका, लग्नानंतर अजून नवीन माणसांचे घोळके वाढतात, आणि मग त्यात ऑफिसचे, सोसायटीतले, मुलांच्या शाळेतल्या मित्रांचे आई वडिलांचे, असे अनेक घोळके वाढत जातात. हे सगळं आपण कशासाठी ओढवून घेतो? ह्या सगळ्याच्या तळाशी कुठेतरी सोबतीची गरज, एकाकीपणाची भीती ठाण मांडून बसलेली असते. आणि एवढे सगळे घोळके असून आपला एकाकीपणापासून बचाव होतो का? lonely आणि alone वेगळ्या गोष्टी असल्या तरीही alone मध्ये lonely ची कित्येकदा सरमिसळ होतेच. कितीही घोळकी असली तरी कधीना कधी एकाकीपणा येतोच. अगदी आपण कितीही मित्र कमावले, जोडीदारावर जीवापाड प्रेम केलं तरीही अशी एक तरी संध्याकाळ येतेच जेंव्हा डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंना पुसायला कोणीच नसतं. मनात कित्येक भावना तुंबून राहिलेल्या असतात पण त्यांचा निचरा करायला जीवाभावाचं कोणी जवळपास नसतं. आणि मग तेंव्हा त्या क्षणी आपल्याला जे वाटतं ना तो असतो एकाकीपणा.
अश्या वेळी खूप असहाय वाटतं. हा क्षण येऊ नये इतका जीव कासावीस होऊन जातो. नवरा, मित्र, नातेवाईक, मुलं ह्या सगळ्यांच्या पार जाऊन ठेवणारं शाश्वत सत्याची जाणीव देणारा विलक्षण अनुभव..म्हणजे एकाकीपणा. त्या क्षणाला एकदा का सामोरं जायला शिकलं की त्याची भीती कुठल्याकुठे पळून जाते. आपण स्वतःसाठी आहोत हे एकदा माहिती झालं की मग कुठल्याही नात्याची गरज उभं राहण्यासाठी लागत नाही. स्वतःची कंपनी एन्जॉय करणं वेगळं आणि स्वतःच स्वतःचे अश्रू पुसणं वेगळं . हे जेंव्हा जमतं तेंव्हा खरं तर एकाकीपणा आणि एकटेपणातला फरक आपण जगलो आहोत असं समजायचं . आजची हि पोस्ट अश्या सर्व कणखर मनांसाठी ज्यांनी कित्येक सोबतीचे क्षण मुकले असतील, ज्यांनी उश्या अश्रूंनी भिजवून ओल्या केल्या असतील, ज्यांनी मनामध्ये दुःख दाटून आलं असतानाही चेहेऱ्यावर एकटेपणाची एक रेषाही उमटू दिली नाही, भरभरून प्रेम करून देखील ज्यांना साधी ओजंळही न भरणारं असं अपूर्ण प्रेम मिळालं, मित्रांच्या घोळका असतानाही ज्यांच्या मनातली घालमेल एकालाही समजू शकली नाही आणि असं असलं तरीही ह्या एकाकी पणाला न घाबरता , त्याला कुशीत घेऊन , आपलंसं करून ज्यांनी स्वतःवर प्रेम करायला सुरवात केली अश्या सर्वांसाठी … एकाकी क्षण जे जगले आणि त्यातून त्यांना स्वत्व गवसलं अश्या सर्वांना cheers…

Advertisements

About saniya bhalerao

I live life on my own terms.. Simple and uninhibited. I love to cry,laugh and express thorough words, music and poetry. I am passionate about science and love being myself!
This entry was posted in एकटेपणा!, Uncategorized and tagged . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s