अमर फोटो स्टुडीओ

नाटक म्हणजे माझा जीव की प्राण. माझं पिल्लू लहान असल्यामुळे फार नाटकांना जाता येत नाही. पण ह्यावेळेस योग जुळून आला. नाटक होतं “अमर फोटो स्टुडीओ”. मनस्विनी लता रविंद्र यांनी लिहिलेलं आणि निपुण धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेलं हे नाटक खूप काही सांगून जातं. तरुण पिढीची एनर्जी उत्तम रित्या capture केली आहे. ती संपूर्ण नाटकभर जाणवत राहते. मला तर वाटतं या नाटकाचा आत्मा हि एनर्जी आहे. सखी आणि सुव्रत ची vibrancy आणि chemistry नाटकाचा टेम्पो हाय नोट वर नेते. तर हि गोष्ट आहे अप्पू आणि तनु ची. २०१७ सालातलं हे तरुण कपल. प्रेमाची कबुली देऊनही नातं पुढे कसं न्यायचं, commitment करावी कि नाही आणि लग्न ह्या संकल्पनेला घाबरून असणाऱ्या ह्या जोडप्याची हि गोष्टं. मग त्यांना प्रेमाची, नात्यांची आणि एकूणच एकत्र जगण्याची किंमत कशी समजते हे अतिशय उत्तम रित्या ह्या नाटकात सादर केले आहे. time travel ह्या कोनसेप्ट चा अतिशय हुशारीने आणि सेन्सिबली वापर करून निपुण धर्माधकारी ह्यांनी दिग्दर्शक पडद्यामागे असूनही रंगमंचावर काय जादू करू शकतो हे दाखवून दिलं आहे. ह्या नाटकातल्या बऱ्याच गोष्टी चाकोरीबाहेर जाऊन करण्याचा प्रयत्न केला आहे. जसंकि सखी अचानक प्रेक्षकांमध्ये येऊन मनसोक्त नाचते आपल्यालाही नाचायला लावते. तिचा वावर मोकळा, बिनधास्त आणि energetic आहे. डान्स सिक्वेन्स, पात्रांचा casual attitude हे सगळं पाठडीतल्या नाटकांपेक्षा नक्कीच वेगळं आहे.

तीन काळांमध्ये चालणारं हे नाटक आपल्याला शेवट पर्यंत गुंतवून ठेवतं. व्ही शांताराम पासून ते अगदी चंद्रिका पर्यंत येणारी सगळीच पात्र, त्यांच्या कहाण्या आणि अप्पू आणि तनु ला त्यातून उमगलेलं सार हे सर्वच अनुभवणं म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव. ह्या गोष्टीला अनेक पदर आहेत. ते हळूहळू उलगडत जातात. कुठेही उपदेशात्मक न वाटता सगळ्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात कलाकार आणि दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. खूप अनसेड गोष्टी फार परिणामकारक रित्या आपल्यापर्यंत पोहोचतात आणि इथेच हे नाटक बाजी मारतं. सर्वच कलाकारांनी अभिनय छान केला आहे पण अमेय वाघचा सहज सुंदर अभिनय छाप सोडून जातो. त्याने साकारलेले ते आजोबा इतके क्युट आहेत आणि आयुष्य कसं जगायचं याची गहन फिलोसोफी इतक्या सहज शब्दात ते मांडतात आणि आपल्याला ते आवडून जातात. लिहायला खूप आहे खरतरं पण कथा उलगडून सांगणं पटत नाही कारण ती अनुभवावी अशीच आहे. नाटकाच्या शेवटी प्रेक्षकांचे फोटो काढून FB वर टाकण्याची कल्पना भन्नाट आहे. नाट्यगृहातून बाहेर पडताना १० – १२ वर्षांनी वय कमी झाल्या सारखं वाटतं. प्रत्येक जण अमर फोटो स्टुडीओतून काहीतरी positive घेऊन जाणार हे नक्की. मग ते डोळे उघडून आपल्या भोवती असलेल्या व्यक्तीच्या प्रेमाची दखल घेणं असो, आपलं प्रेम जाहीर करणं असो, नाते संबंधांवर विश्वास ठेवणं असो, आई वडिलांकडे फक्त आपले पालक ह्या दृष्टीकोनातून बघण्यापेक्षा माणूस म्हणून बघायला शिकणं असो काळ आणि वेळेचा आदर करणं असो किंवा जे आपल्याकडे आहे त्या बद्दल कृतज्ञ असणे असो… अश्या कित्येक गोष्टीची जाणीव हा अमर फोटो स्टुडीओ करून देतो.. अश्या गोष्टी ज्या शब्दांच्या पलीकडच्या आहेत… या सर्व तरुण कलाकारांची विलक्षण एनर्जी आणि काळाच्या पटांची सुरेख सरमिसळ आणि त्यातून उमगलेलं तत्वज्ञान हे या नाटकाचा USP आहेत. Its an elixir to soul..Full of madness, crazy energy and vibrancy..त्यामुळे हे नाटक अनुभवावं असचं आहे…

Advertisements

About Saniya Bhalerao

I am M.Tech in Biotechnology. Academics and research in life sciences is what i do! But my passions are movies, Music and books! I write to express my feelings about everything that makes me feel alive.. मी सानिया! जगण्यासाठी आवश्यक अश्या चार गोष्टी आहेत माझ्यासाठी पुस्तकं, नाटक - सिनेमे , संगीत आणि सायन्स! ज्या ज्या गोष्टी मला जिवंत ठेवतात त्या सगळ्यांवर मला लिहायला आवडतं. माझं भाषांवर खूप प्रेम आहे. बंगाली, जर्मन, रशियन, फ्रेंच, तुर्किश अश्या कित्येक भाषांमधलं साहित्य जे इंग्रजी मध्ये अनुवादित केलं आहे ते मला वाचायला आवडतं. बुकर, पुलित्झर, नोबेल पारितोषिकं मिळालेले लेखक मी वाचते आणि त्यांचा तगडा प्रभाव माझ्यावर आहे. मराठी मला जवळची वाटते आणि म्हणून मी मराठीत लिखाण करते. माझ्या विश्वात तुमचं स्वागत आहे!
This entry was posted in अमर फोटो स्टुडीओ, Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s